तुम्ही टप्प्यात कार्यक्रम केला; जयंत पाटलांनी हॉकी संघाला दिल्या हटके शुभेच्छा

Minister Jayant Patil congratulates the Indian hockey team
तुम्ही टप्प्यात कार्यक्रम केला; जयंत पाटलांनी हॉकी संघाला दिल्या हटके शुभेच्छा

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत भारताला कांस्यपदक पटकावून दिलं. तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला पदक मिळालं आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्यपदक पटकावलं आहे. मुळे देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच जयंत पाटलांनी हटके शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. आज ४१ वर्षांनी हॉकी संघाने कांस्यपदक मिळवलं आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारं आहे, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला

भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला ५-४ च्या फरकाने पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचं पदक जिंकलं होतं. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं.