Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पत्रकारांना कोरोना लस देण्याची व्यवस्था करावी, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पत्रकारांना कोरोना लस देण्याची व्यवस्था करावी, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतेय

Related Story

- Advertisement -

पत्रकारांसाठी कोरोना लसीकरण सुरु करा अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्यात यावे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच लसीकरणाबाबत घोषणा केली जाईल असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तरुणांना कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण आणि पत्रकार यांचे बाहेर फिरण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्याही लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणेजरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती. पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे. जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतेय. त्यामुळे १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोना लसीकरणाची मोहीम राबविली आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकर करण्यात येत आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. परंतु पत्रकार आणि १८ते ३५ वयोगटातील तरुणांना कोरोना लसीकरण करण्यात यावे असे अनेक नेत्यांचे मत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -