घरमहाराष्ट्रमंत्री, आमदार, खासदारांनी थकवली लाखोंची वीज बिले

मंत्री, आमदार, खासदारांनी थकवली लाखोंची वीज बिले

Subscribe

उर्जा विभागाने थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. यानुसार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील आमदार, खासदार मंत्री यांची १ कोटी २७ लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

वीजबिल भरले नाही तर महावितरण सर्वसामान्यांनचा वीज पुरवठा खंडीत करते. मात्र, मंत्री, आमदार, खासदारांवर कसलीही कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. मंत्री, आमदार, खासदारांनी अशा ३७२ जणांकडे १ कोटी २७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

उर्जा विभागाने थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. यानुसार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील आमदार, खासदार मंत्री यांची १ कोटी २७ लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २५ हजार रुपये, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ३ हजार ५४१ रुपये, आरोग्यमंत्री राजेश टोपे याची ४ लाख रुपये थकबाकी आहे. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडे १० हजार रुपये, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २ लाख ६३, हजार रुपये, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी २० हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे.

- Advertisement -

हे आहेत थकबाकीदार

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत
  • केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70  हजार रूपये थकबाकी
  • आमदार समाधान आवताडे एकूण वीस हजार थकबाकी
  • आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी
  • आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत
  • खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार विज जोडणीतील तीन लाख रुपये
  • आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत
  • शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत
  • आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत
  • आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगीक विज जोडणीची  2 लाख 80 हजार थकबाकी
  • माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी
  • माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी
  • मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी
  • खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी
  • आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी
  • आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी
  • राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी
  • आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत
  • आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये
  • माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी
  • सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435
  • श्रीमंत युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934
  • माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे
  • भाजप आमदार जयकुमार गोरे सात लाख रुपये थकबाकी
  • माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -