घरताज्या घडामोडीमी पंतप्रधानांकडून अहंकाराचे धडे घेतोय, नवाब मलिकांचा भाजपला खोचक सल्ला

मी पंतप्रधानांकडून अहंकाराचे धडे घेतोय, नवाब मलिकांचा भाजपला खोचक सल्ला

Subscribe

दरेकरांची पब्लिसाठी धडपड

नाशिक झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांवर हल्लाबोल केला आहे. दरेकर जॅकेट घालून आरशासमोर न्याहाळून टीव्हीसमोर येतात आणि कॅमेरामनला विचारतात मी कसा दिसतो याला घेरणं बोलत नाहीत. तर भाजप नेते राज्य सरकारला अहंकारी म्हणत आहे. परंतु राज्य सरकारचे नेते जमिनीवर आहेत. परंतु अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकत असल्याचा खोचक टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

भाजप नेत्यांनी अहंकारी सरकार असल्याचे म्हटले आहे. यावर नवाब मलिक यानी म्हटले आहे की कोण किती अंहकारी आहे ते लोक पाहतच आहेत. तसेच भाजपचा अहंकार लोक पाहत आहेतच. राज्य सरकारचे नेते अजून जमिनीवरच आहेत. परंतु अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकत आहोत असा खोचक टोला नवाब मलिक यांनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -

दरेकरांची पब्लिसाठी धडपड

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरार आग दुर्घटनेबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी दरेकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मलिक यांनी म्हटले आहे की, राज्यात सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट केल्यानंतरच परवानगी दिली जाते. एखाद्या खासगी रुग्णालयातील एसीच्या स्फोटमुळे आग लागल्यास राज्य सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. तसेच दरेकरांना टोला लगावत सरकारला कोण घेरतंय हा प्रश्न आहे असे म्हणाले तर काही झाले तरी उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येतात आणि प्रतिक्रिया देण्यापूर्वी कॅमेरामनला विचारतात कसा दिसतो तर काही विरोधी पक्षनेते फक्त कार्यालयात बसून माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे काम करतायंत असा टोला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -