घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी शिर्डीत; साईबाबांचं घेतलं दर्शन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शिर्डीत; साईबाबांचं घेतलं दर्शन

Subscribe

दिवाळीपूर्वी साईबाबांचं दर्शन मिळाल्याचा‌ व्यक्त केला आनंद

शिर्डी – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि.२८) साईबाबांच्या दरबारात हजेरी लावत दर्शन घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी गडकरींचं शिर्डीत जल्लोषात स्वागत केलं.

दौऱ्यादरम्यान गडकरी यांच्यासमवेत खासदार सुजय विखे-पाटील, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वाहडणे, विश्वस्त एकनाथ गोंदकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आदींसह मोजके भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळीपूर्वी साईबाबांचं दर्शन मिळाल्याचा‌ आनंद व्यक्त करतानाच, साईचरणी देशवासीय कोविडच्या संकटातून मुक्त होवो, अशी प्रार्थना केल्याचं गडकरींनी सांगितलं. तसंच, त्यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -