घर ताज्या घडामोडी जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे को डिसिप्लिन चाहिये; मंत्री...

जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे को डिसिप्लिन चाहिये; मंत्री दीपक केसरकरांनी IPS अधिकाऱ्याला सुनावलं

Subscribe

जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसिप्लिन चाहिये, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आयपीएस अधिकाऱ्याला सुनावले. भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसिप्लिन चाहिये, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आयपीएस अधिकाऱ्याला सुनावले. भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दीपक केसरकर उपस्थिती होते. यावेळी मंचावर बोलताना दीपक केसरकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना भाषण थांबवून झापले. (minister of marathi language of maharashtra deepak kesarkar slam ips officer bhiwandi thane)

भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाषण करत होते. केसरकरांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावर आयपीएस अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत जोरजोरात चर्चा करत होते. या अधिकाऱ्यांच्या बोलण्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत होता. त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून झापले.

- Advertisement -

“जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारीने डिसीप्लेन समजना चाहिये, हमे पता है, कि तुम्हे लँगवेज का प्रॉब्लम है. मैं आखरी बार वार्निंग दे रहा हू, असे बोलून किमान मंत्र्यांचे भाषण सुरु असताना तरी बडबड करू नका ”, अशा शब्दांत केसरकर यांनी व्यासपीठावर हेड सीएचआर आणि ससस्टेन निबिलिटी एलटीआर असलेले आयपीएस अधिकारी प्रत्युष पांडा यांना झापले.

भिवंडीत प्रथमच जिल्हा परिषद माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशनचे उद्घाटन काल्हेर येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले. या उद्धाटनाला जाताना मंत्री दीपक केसरकर यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या वाहतूक कोंडीवरही दीपक केसरकर यांनी भाष्य केले. वाहतूक कोंडीचा बाबतीत आमदार शांताराम मोरे त्यांनी विशेष सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच ही बाब मी मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकरांचं आवाहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -