घरताज्या घडामोडीआगामी सरकारमध्ये प्रहारचा मुख्यमंत्री होईल, राज्यमंत्री बच्चू कडूंचा अजब दावा

आगामी सरकारमध्ये प्रहारचा मुख्यमंत्री होईल, राज्यमंत्री बच्चू कडूंचा अजब दावा

Subscribe

विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या आमदार पक्षांचं मोठ्या प्रमाणात वजन वाढलं आहे. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडूंनी विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत जोरदार टोलेबाजी केली आहे. येणाऱ्या काळात अपक्ष आणि लहान पक्षांचा प्रभाव असाच राहील, एक दिवस प्रहारचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी सरकारमध्ये प्रहारचा मुख्यमंत्री होईल, अशी मिश्किल प्रतिक्रिया आणि अजब दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

माझी जन्मभर नाराजी राहणार नाही मेल्यावरसुद्धा राहणार नाही पण जेव्हा नाराजी असेल तेव्हा झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असाही दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला.

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीत दुपारी २ वाजेपर्यंत २७५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. तर अजूनही १० आमदारांचं मतदान अजूनही शिल्लक आहे. यात शिवसेनेच्या आमदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. आवश्यक संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी पाच-पाच गटांत मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यामुळे कोणता उमेदवार या एका जागेवर बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं आहे.


हेही वाचा : आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ, मतदानापूर्वीच अटक करण्याची महाविकास आघाडीची खेळी?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -