राज्यमंत्री बच्चू कडू आगामी निवडणूक भोंग्याशिवाय लढणार

निश्चितच प्रदुषण होत आहे. मग ते मदिर, मशीद किंवा बुध्द बिहार किंवा राजकीय भोंगे असू दे. हे सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे या मताचा मी आहे. निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असे भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे.

Minister of State Bachchu Kadu will not use loudspeakers in the next elections
Minister of State Bachchu Kadu will not use loudspeakers in the next elections

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ते आगामी निवडणूक भोंग्यशिवाय लढणार आहेत. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. यावेळी भोंग्याचा वाद सामोपचाराने मिटू शकतो, असे ही ते म्हणाले.

राज्यात कोणतंही तणावाचे वातावरण नाही. तणाव निर्माण करणारी एकही घटना घडलेली नाही. काम में कुछ नहीं, बातों में बहोत है अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारांनी राज्याचे किंवा देशाचे फार चांगले काही होणार नाही. भोंगे हा विषय सामोपचारानेच मिटू शकतो, वाद करून मिटणार नाही, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

निश्चितच प्रदुषण होत आहे. मग ते मदिर, मशीद किंवा बुध्द बिहार किंवा राजकीय भोंगे असू दे. हे सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे या मताचा मी आहे. निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असे भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे. ते देखील बंद व्हावेत. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.

आगामी निवडणूक भोंग्याशिवाय –

यावेळी मी माझा निर्णय घेतो. मी आगामी निवडणूक भोंग्याशिवाय लढणार आहे. कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे. फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजतील, असे ते म्हणाले.