Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र '...म्हणून मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे'

‘…म्हणून मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे’

Related Story

- Advertisement -

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांशी असलेल्या संबंधांबाबत एक वक्तव्य केले आहे. ”माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या, मात्र हे खाते चालवत असताना राज्यपालांशी संपर्क येत असतो. माझा वर्षभराचा कार्यकाळ पहिला तर लक्षात येईल माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत”, असे ते म्हणाले.

सोलापूरात बोलत असताना त्यांनी असेही म्हटले की, माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो, राज्यपालांचा मी लाडका मंत्री असल्याने मला कोणतीही अडचण येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मी राज्यपालांशी चर्चा करुन आलो. अनेक विषयांवर आमच्यात चर्चा झाली. राजकीय जे काही कार्यक्रम होत आहेत किंवा राजकीय ज्या काही गोष्टी घडतात त्या वेगळ्या आहेत. मात्र हे खातं चालवत असताना राज्यपालांशी माझा अधिक संबंध असायचा, मला राज्यपालांकडे जावं लागतं. त्यांना भेटावं लागतं, असेही उदय सामंत म्हणाले. मला कुलपती म्हणून काही कामकाजही राज्यपालांसोबत करावं लागतं, असंही सामंत पुढे म्हणाले. वर्षभराचा आलेख जर बघितला तर माझे आणि राज्यपलांचे चांगले संबंध आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपासून सुरु

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याचा संभ्रम असताना उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करून संबंधित विद्यापीठाने निर्णय घ्यावा. संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू महाविद्यालय कधी नियमित सुरू करायचे, याचा निर्णय घेतील. १५ तारखेपासून महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉलेजमध्ये ५० टक्के उपस्थिती असली पाहिजे. मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisement -