घरमहाराष्ट्रPulwama Attack : आता आम्हाला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा - रामदास आठवले

Pulwama Attack : आता आम्हाला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा – रामदास आठवले

Subscribe

राजकारणात आम्ही विरोधी असू पण देशासाठी आम्ही एकत्र येऊ आणि पाकिस्तानला धडा शिकवू असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीतून काश्मीर दहशतवादी हल्ल्या प्रकरणी पाकिस्तानावर टीका करत निषेध नोंदवला. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या कवितांच्या माध्यमातून पाकिस्तानवर टीका केली आहे.

- Advertisement -

या कवितांच्या माध्यमातून निषेध

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी तासगावमध्ये मी आलो आहे आज, कारण मला उतरवायचा आहे पाकिस्तानचा माज.” “असे भ्याड हल्ले करतात का वाटत नाही पाकिस्तानला लाज, नरेंद्र मोदीजी एक दिवस तोडून टाकणार आहे इमराजन खानचा ताज” अशा कविताच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे.

पाकिस्तानला धडा शिकवू

तसेच पाकिस्तान सतत हल्ले करून भारताला डीवचण्याचे काम करत आहे. पण आम्ही वाघ आहोत. पाकिस्तान आमच्या समोर काहीच नाहीत. राजकारणात आम्ही विरोधी असू पण देशासाठी आम्ही एकत्र येऊ आणि पाकिस्तानला धडा शिकवू. तसेच पूर्वी मी शरद पवार यांच्यासोबत होतो. पण आज मी नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे. राजकारणात सर्व काही होत असते असेही आठवले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -