घरताज्या घडामोडीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, पोलीस जखमी

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, पोलीस जखमी

Subscribe

राज्यमंत्री विश्वजीत कदम पोलिसांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी करण्यासाठी रवाना

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आपल्या मतदार संघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. पाहणी दौऱ्यादरम्यान विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाला आहे. ताफ्यातील पोलीसांची गाडीला अपघात होऊन रस्त्याच्या पलीकडे पडली यामुळे गाडीतील दोन पोलीस जखमी झाले आहेत. राज्यमंत्री विश्वजीत कदम सुरक्षित आहेत. दोऱ्यावर असताना दुचाकी स्वार व्यक्ती आडवी आल्यावर वाचवताना गाडी पलटी झाली यामुळे भीषण अपघात घडला आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप इथे पाहणी दौऱ्या करता जात असताना हा अपघात घडला आहे.

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात होते. पाहणी दौऱ्यावर जात असताना ताफ्याच्या मध्ये दुचाकी आडवी आली आणि भीषण अपघात घडला. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी दुचाकीला वाचवताना पलटी झाली. पोलिसांच्या गाडीने पलटी मारुन रस्त्याच्या बाजूला पडली यामुळे २ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी आपल्या गाडीत जखमी पोलिसांना बसवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या अपघातामध्ये राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप आहेत. पोलिसांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी करण्यासाठी रवाना झाले. विश्वजीत कदम सांगली भागाचा दौरा करत असून आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून पूरपरिस्थितीबाबत माहिती देतील.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -