घरमहाराष्ट्रअमोल मिटकरींवर गंभीर आरोप, सरकार निःपक्ष चौकशी करेल - राधाकृष्ण विखे पाटील

अमोल मिटकरींवर गंभीर आरोप, सरकार निःपक्ष चौकशी करेल – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

अकोला –अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्याचे सूतोवाच भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. अकोला दौऱ्यावर असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे सूतोवाच केले.

अमोल मिटकरी यांच्या संदर्भातला आरोप फार गंभीर आहेत. सरकार त्यामध्ये निःपक्ष चौकशी करेल, असे मंत्री विखे पाटील म्हणाले. तसेच, मागील काळात माहाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी मिटकरींनी बोलताना वागताना भान ठेवायला हवे होते. वाट्टेल त्या पद्धतीने वाचाळपणा सुरू होता, कुठेतरी त्यांच्यावर आवर घालायाला हवी होती. काही लोकांनी लोकशाहीमध्ये वाचाळपणा करणे उचित नाही. त्यांच्या पक्षाचे नेत्यांनी हा विचार केला पाहिजे. आपल्या या अशा बेलगाम लोकांमुळे पक्ष बदमान होतोय, पक्षाचे नेतृत्व बदनाम होत आहे. मात्र, जर पक्षाच्या नेतृत्वाची त्यांना संमती असेल, तर हे दुर्दैवी आहे, असा टोलाही महसूल मंत्र्यांनी लगावला.

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद वाढल्याचे दिसून आले. यानंतर समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा आता मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर केला. आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यासह अन्य दोघांना ही मानहानीची नोटीस बाजवण्यात आली आहे. या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत दिले.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -