घरताज्या घडामोडीमुनगंटीवारांकडून व्यासपीठावरच खदखद व्यक्त

मुनगंटीवारांकडून व्यासपीठावरच खदखद व्यक्त

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये भाजपाचे दोन गट महाराष्ट्रात पडल्याचे दिसत आहे. काही नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधतात तर, दुसरीकडे काही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत असतात. यावरुन भाजपामधील धुसपूस दिसून येते

मुंबई : राज्यात महासत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये काही घडतंय बिघडतंय अशी परिस्थिती पाहायला मिळते. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच, मला भेटायला वेळ मिळत नाही, तुम्ही मला भेटीसाठी वेळ देत नाही, अशी खदखद व्यक्त केली. यामुळे भाजपमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचे दिसतंय.

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर केंद्रातील बड्या भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेणं राज्यातील भाजपा नेत्यांना अडचणीचे झाले आहे. काही वरिष्ठ नेत्यांचा थेट संपर्क तुटला असून नव्या आणि युवा नेत्यांचा थेट संपर्क वाढला आहे. यामुळे भाजपातील काही नेते अस्वस्थ झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याबद्ल अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपा नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कान टोचले असल्याची माहिती समोर आली होती. तर आता सुधीर मुनगंटीवार यांनी, तुम्ही भेट देत नाहीत, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क वाढत चालला आहे. यामुळे भाजपात ज्येष्ठ-श्रेष्ठ असा नाराजीचा खेळ पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये भाजपाचे दोन गट महाराष्ट्रात पडल्याचे दिसत आहे. काही नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधतात तर, दुसरीकडे काही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत असतात. यावरुन भाजपामधील धुसपूस दिसून येते..

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायची आहे. राज्यातील सत्तांतरानंतर काही नेते अडगळीत पडले असून त्यांचा केंद्राशी संबंध कमी झाला आहे. काही कामासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ घेत असल्याची कुजबूज होत आहे. तर मुनगंटीवार यांनी सभेत संबोधित करताना अमित भाईजी मला कधी वेळ मिळत नाही, तुम्ही देतही नाही, असे म्हटल्यामुळे काही राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आणि मुनगंटीवारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुनगंटीवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सहाय्याने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीचा वेळ घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.


हेही वाचा : अंत:करणामध्ये सुविचार ठेवून त्या अनुरूप प्रत्येकाला वर्तन करता यायला हवे – आप्पासाहेब धर्माधिकारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -