Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. अनेकदा विरोधकांना प्रश्न विचारायचे असतात, मात्र, सत्ताधारी आमदार किंवा मंत्री जागेवर नसल्याने विरोधक त्यावर आक्षेप घेत असतात. आज मात्र, विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नांची मांडणी करताना विरोधी आमदार गैरहजर असल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. (minister uday samant aggressive over opposition mla absent in vidhansabha)
विधिमंडळाचा वेळ अमूल्य असतो. सगळ्यांना बोलायची संधी मिळावी, वेळ मिळावा, यासाठी विधिमंडळाच्या कामकाजात सर्व आमदार तसेच मंत्र्यांनी वेळेत हजर राहावे, असा नियम आहे. अनेकदा विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सत्ताधारी मंत्री विधिमंडळाच्या कामकाजात अनुपस्थित राहतात. मात्र आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवर मंत्रिमहोदय उत्तर देत असताना विरोधी आमदार गैरहजर असल्याचे दिसले. यावरून उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – Fake Paneer : भाजप आमदाराने विधानसभा अध्यक्षांना थेट पनीरच खाऊ घातलं, कारण काय –
आज सात लक्षवेधी आहेत, त्यापैकी फक्त एक सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत. काही सदस्यांनी पत्र दिले आहे की लक्षवेधी पुढे ढकला. ज्यावेळी मंत्री सभागृहात नसतात तेव्हा त्याबाबत आरडाओरडा होतो. त्यांच्या कामावर आक्षेप घेतला जातो. पण, आज सभासद उपस्थित नाहीत. मंत्री म्हणून माझी विनंती आहे की जे सभासद उपस्थित नाहीत त्यांच्या लक्षवेधी रद्द कराव्या, अशी मागणी उदय सामंत यांनी केली.
असंच सुरू राहिलं तर अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घ्यावा लागतो. सभासद साडेबारा वाजता संपतं त्यानंतर अधिकाऱ्यांचा देखील विचार करावा, अशी माझी विनंती आहे. त्यामुळे जे इथे येणार नाहीत त्यांच्या लक्षवेधी रद्द कराव्यात. पत्र दिलेल्यांना अगोदरच विचारायला हवं होतं, येणार की नाही. म्हणजे आम्ही अभ्यास करायचा आणि इथे आल्यावर सभासद नाहीत, त्यावर काय करायचं?” असा सवालही उदय सामंत यांनी केला.
हेही वाचा – POP Ganesh Idol : पीओपीच्या मूर्तींचा नियम शिथिल होणार? विधानसभेत पंकजा मुंडे म्हणाल्या –