घरमहाराष्ट्रकृषीमंत्र्यांच्या बहिणीने का मागितले मंत्र्यांचे राजीनामे ?

कृषीमंत्र्यांच्या बहिणीने का मागितले मंत्र्यांचे राजीनामे ?

Subscribe

शिक्षकांच्या पेन्शन मागणीबद्दल सौ संगिता शिंदे या उपोषणाला बसल्या असून हा प्रश्न न सोडविणाऱ्या मंत्री व आमदारांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

जे कोणी आंदोलनात येतात, मंत्री येतात, आमदार येतात, ते बोलून जातात की माझे मोठे बंधू कृषीमंत्री झालेत, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे. पण मी या सर्वांना विनंती करते की जे नातं असतं, ते घरचं असते, मी हे सर्व समाजासाठी करते आहे आणि तेही समाजासाठी करत आहे. मी शासनाविरोधात आंदोलन करत आहे३८५ शिक्षक माझ्यासोबत ४ दिवसांपासून उपाशी राहतात, याची तळमळ या मंत्री आणि आमदारांना नाही, खरोखर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे’, अशी मागणी केलीय शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी..

- Advertisement -

विद्यमान कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संगिता शिंदे या भगिनी असून १८ जूनपासून त्या शिक्षक आंदोलकांसह आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. १ नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित , अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर नियुक्त, परंतु 1नोव्हेंबर 2005 नंतर शासनाचे 100 % अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आज विधानसभेत स्थगन प्रस्तावादरम्यान या प्रश्नावर विरोधक आमदारांनी लक्ष्यवेधी मांडली, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या पोलिसांनी दिलेल्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त केला. त्यामुळे संगीता शिंदे यांचे नाव चर्चेच्या अग्रभागी आले.

मूळच्या अमरावती येथील रहिवासी असलेल्या संगीता शिंदे या मागील अनेक वर्षांपासून शिक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नावर आंदोलन करत आल्या आहेत. त्यांचे वडील हेही प्राथमिक शिक्षक राहिलेले आहेत. सध्या ज्या पेन्शनच्या मुद्दयावर त्या लढा देत आहेत, ती शिक्षकांची मागणी जुनी असून त्यासाठी समितीच्या लोकांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह अनेकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मात्र त्यांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघू न शकल्याने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अनुसरला असून जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत आम्ही येथेच आमरण उपोषण करत राहू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

कालच या प्रश्नासंदर्भात त्यांचे मोठे बंधू डॉ. अनिल बोंडे यांच्या मध्यस्थीने नवनियुक्त शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा झाली. हा प्रश्न अधिवेशनात मांडू असे आश्वासन त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आले, मात्र त्या बैठकीत समाधानकारक चर्चा होऊ शकली नसल्याचे सौ शिंदे सांगतात. चार दिवसांच्या उपोषणामुळे काही सहका्ऱ्यांची प्रकृती खालावली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान आझाद मैदानावर आंदोलनासाठी १० ते ६ दरम्यान परवानगी असते. त्यानंतर पोलिसांनी या उपोषणकर्त्यांना बळाचा वापर करून बाहेर काढल्याचा आरोप आज विरोधकांनी विधानसभेत केला. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण या मुद्दयावरून तापले होते.

हा मुद्दा समोर आल्यानंतर काही वेळातच शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम यांनी आझाद मैदानात जाऊन या शिक्षक आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी कुठलेही निवेदन स्वीकारले नसल्याने आंदोलनकर्ते नाराज झाले. इतकेच नव्हे, तर तुमचे बंधू कृषी मंत्री आहेत, त्यांच्यामार्फत तुमचा प्रश्न शासनाकडे मांडा असा सल्लाही त्यांनी सौ. शिंदे यांना दिला. त्यामुळे या प्रकाराबद्दल सौ. शिंदे यांनी रोष व्यक्त केला.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -