घरमहाराष्ट्रगावठी पिस्तुलांसह तरुणाला अटक

गावठी पिस्तुलांसह तरुणाला अटक

Subscribe

पुणे : खेड तालुक्यांमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना धोकादायक हत्यारे वापरणार्‍या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यावर पोलिसांकडून उपाययोजनाही केल्या जातात. मात्र पिस्तुलासारख्या वस्तू तरुणांकडे सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत आहे. येथे एका तरुणाला गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे.

खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजगुरुनगर येथील बसस्थानकात एका तरुण गावठी बनावटीचे पिस्तूल वापरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून राजगुरुनगर बस स्थानकात साफळा रचून पोलिसांनी अमर बाळासाहेब शेवाळे (21) या लांडेवाडी भागात रहाणार्‍या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक राऊड सापडला. आरोपी अमर शेवाळे याला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राजगुरूनगर चाकण परिसरात अशा पद्धतीचे हत्यारांचा वापर वाढला आहे. त्यामुळे अशा पोलिसी कारवाई होणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -