घरउत्तर महाराष्ट्रआधारतीर्थ आश्रम बालक खूनप्रकरणात अल्पवयीन मुलगा ताब्यात

आधारतीर्थ आश्रम बालक खूनप्रकरणात अल्पवयीन मुलगा ताब्यात

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील बहुचर्चित आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षीय आलोक शिंगारे या बालकाच्या खूनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आश्रमातीलच १४ वर्षीय मुलास ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाने इगो व किरकोळ कारणातून आलोकची हत्या केल्याचे समजते.

आधारतीर्थ आश्रमात आलोक व त्याचा भाऊ आयुश (वय ११) राहत होते. सोमवारी रात्री आश्रमातील सर्व विद्यार्थी एकाच खोलीत झोपले होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता आश्रमात घंटा वाजवण्यात आली. त्यावेळी सर्व मुले जागी झाली पण आलोक जागा झाला नाही. आश्रमातील मावशींनी आलोकला पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी ४ वाजता आलोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये आलोकचा गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. आधारतीर्थ आश्रमामध्ये चार वर्षीय आलोक विशाल शिंगारेचा गळा आवळ्याचे समजताच नाशिक ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आधारतीर्थ आश्रमाची पाहणी केली असता आश्रमात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याचे समोर आले. पोलिसांनी बुधवारी व गुरुवारी आश्रमातील मुलांचे जबाब घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये नववीतील अल्पवयीन मुलावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आलोकचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

सखोल चौकशी करा : पालकमंत्री

या प्रकरणाची पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश ग्रामीण पोलिसांनी दिले. शिवाय, त्यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आधारतीर्थ आश्रमात यापूर्वी सहा वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, राजकीय दाबावपोटी हे प्रकरण बाहेर आले नव्हते. परंतु, आता अलोकचा खून झाल्याचे समोर आल्याने आधारतीर्थच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -