मीरा-भाईंदरमध्ये शिवसैनिकांची बंडखोरांकडे पाठ

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोड़ींना वेग आला आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची जबाबदारी असलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी बंडखोरी केल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण येथील नगरसेवक, शिवसैनिकांनी बंडखोरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र युवासेनेचे नेते पूर्वेश सरनाईक यांनी मीरा रोड स्थित मंगल नगर कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नगरसेवक राजू भोईर, अनंत शिर्के, नगरसेविका संध्या पाटील, स्वीकृत सदस्य विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते.

या परिसरात माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीस उपनेते विनोद घोसाळकर मार्गदर्शन करण्यास आले होते. यावेळी गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक प्रवीण पाटील, कमलेश भोईर, दिनेश नलावडे, जयंतीलाल पाटील आणि इतर सेनेचे नगरसेवक या सभेला उपस्थित होते. परंतु नगरसेविका वंदना पाटील यांचा मुलगा विराज सेनेसोबत तर वडील विकास हे बंडखोर गटात दिसले. विरोधी पक्षनेते धनेश पाटीलसह नगरसेविका वंदना पाटील, कुसुम गुप्ता आदी काहींनी दोन्ही ठिकाणी बैठकीला जाणे टाळल्याची चर्चा आहे.

काल देखील युवासेनेची बैठक पार पडली होती. यामध्ये जवळपास अनेक बंडखोरांच्या मुलांनीही बैठकीस हजेरी लावली नव्हती. मात्र, आज सुप्रीम कोर्टाने अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदें गटाला दिलासा दिला असून अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर अद्यापही कायम आहे. तसेच या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार असून १२ जुलैपर्यंतची मुदत बंडखोरांना देण्यात आली आहे.


हेही वाचा : ‘शिवसेने’कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची