Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मीरा-भाईंदर, वसईतील पावसाळी पर्यटन स्थळे १८ ऑगस्टपर्यंत बंद

मीरा-भाईंदर, वसईतील पावसाळी पर्यटन स्थळे १८ ऑगस्टपर्यंत बंद

Related Story

- Advertisement -

पावसाळ्यात शनिवार- रविवासह इतर दिवशी पर्यटकांची पावलं मुंबई शहराजवळील नदी, धबधबे आणि तलावांकडे वळतात. मात्र मीरा भाईंदर, वसई विरार शहरातील समुद्र, धबधबे, नदी, खाडी, तलावांजवळ जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर कोणीही नियम मोडून फिरणाऱ्यांसाठी कलम १४४ नुसार फौजदारी नाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्याने अनेक पर्यटन वसई किल्ला, राजोडी बीच, उथ्थन बीचवर पर्यटकांची तुफान गर्दी पाहयला मिळत आहे. मीरा भाईंदर – वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत. समुद्रकिनारी पर्यटक तसेच मद्यपी मोठ्या संख्येने पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने मोठ-मोठ्या लाट उसळत असतात. अशा परिस्थितीत समुद्रकिनारी, किंवा समुद्राच्या पाण्यात उतरणारे पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे अनेकदा याठिकाणी समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

तशीच परिस्थिती ही चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी असते. पावसात या ठिकाणी पर्यटक पाण्यात वाहून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदीतही अनेकदा तरुण पार्टी करण्यासाठी येत असतात. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेले तरुण नदीत पोहताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवित हानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे. १८ ऑगस्ट पर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.

त्यामुळे मीरा-भाईंदर आणि वसई विरार शहारांतील नदी, धबधबे आणि तलावांवर सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मद्य विक्री करणे, ध्वनीक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक- थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


पायी वारीला नकार, मात्र यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतही अद्याप संभ्रम


- Advertisement -

 

- Advertisement -