घरमहाराष्ट्रभाजपाकडून मिशन ४५ ची घोषणा; शुभेच्छा देत शरद पवार म्हणाले, खरंतर...

भाजपाकडून मिशन ४५ ची घोषणा; शुभेच्छा देत शरद पवार म्हणाले, खरंतर…

Subscribe

Sharad Pawar | बारामती येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची त्यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, पार्थ पवार उपस्थित होते.

Sharad Pawar | बारामती – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन मिशन ४५ ची घोषणा केली आहे. लोकसभेच्या ४५ जागा जिंकू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मात्र, यावरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे.पी.नड्डांना टोला लगावला आहे. भाजपाला शुभेच्छा देत त्यांनी ४८ जागा जिंकाव्यात असं शरद पवार म्हणाले. बारामती येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची त्यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, पार्थ पवार उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, भाजपाने खरंतर मिशन ४८ ठरवायला हवे होते. राज्यात ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ करून चूक केली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या राज्यात हिमाचल प्रदेशमध्ये काल-परवाच निवडणूक पार पडील. त्यांच्या हातातील सत्ता लोकांनी काढून घेतली. भाजपच्या राष्ट्राध्यक्षांना स्वचःच्या राज्यात पक्षाची सत्ता असताना तसेच केंद्रीय सत्तेचे पाठबळ असताना सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन केलेल्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची, असा प्रश्नही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांच्या ‘धर्मवीर’वरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असं म्हटलं होतं. यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. अजित पवारांची पाठराखण करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, तो हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, असं म्हटलं. यावरून राज्यभरात राष्ट्रवादी पक्षाविरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसंच, येत्या काळात अजित पवार माध्यमांसमोर येऊन त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा – अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी; राऊतांची टीका

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यातही काही वावगं नाही. त्यामुळे धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक या बिरुदांबाबत तक्रार नाही. यावरून वाद नको. धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच, असं शरद पवार म्हणाले. तसंच, अजित पवार त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्याकरता लवकरच माध्यमांसमोर येतील, असं शरद पवार म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -