‘माझी मोहीम आज पूर्ण…’; संजय पांडेंच्या अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांचे ट्विट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. संजय पांडेंच्या अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक सुचक ट्विट केले आहे.

ED summons ex-Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in NSE co location case

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. संजय पांडेंच्या अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक सुचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Mission Completed today BJP leader Mohit Kamboj tweet after Sanjay Pandey arrested)

संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर “Mission Completed today”, असे ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले. या ट्विटसह त्यांनी याआधी केलेली अनेक ट्विट सुद्धा रिट्विट केली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंबोज यांनी ही कारवाई सुडबुद्धीने झाली, असा आरोप केला होता. शिवाय, त्यावेळी कंबोज यांनी संजय पांडे यांना थेट आव्हान दिले होते.

संजय पांडे यांना आव्हान देत त्यांनी पुढील काळात एका मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडणार असल्याचा दावाही केला होता. याशिवाय त्यांनी पांडे कुठल्या पक्षात प्रवेश करणार, असे ट्विटही २६ एप्रिल रोजी केले होते.

दरम्यान, संजय पांडे यांना अटक झाल्यानंतर एक संजय तुरुंगात गेला, दुसरा लवकरच, असे सूचक ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. परंतु, या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

नेमके प्रकरण काय?

सीबीआयच्या दाव्यानुसार, 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. त्यावेळी एका आयटी कंपनीला एनएसईची सुरक्षा ऑडिट आणि लीगल कन्सल्टन्सीसाठी काम देण्यात आले होते. ही आयटी कंपनी संजय पांडे यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. ही कंपनी संजय पांडे यांनी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता, त्यानंतर सुरू केली होती. मात्र, त्यावेळी राजीनामा मंजूर न झाल्याने त्यांना पुन्हा भारतीय पोलीस सेवेत दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर या कंपनीची मालकी हक्क पांडे यांच्या कुटुंबीयांकडे होती. याच कंपनीच्या माध्यमातून चित्रा रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून एनएसईमधील मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याची माहिती तपासात समोर आली. याचप्रकरणी त्यांच्या विरोधात सीबीआयने 3 गुन्हे दाखल केले असून ईडीनेही 2 गुन्हे दाखल केले आहेत.

फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे. या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅंपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. त्या फोन टॅपिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे तपासात सीबीआय आणि ईडीला मिळाले. विशेष म्हणजे संजय पांडे यांच्या कंपनीला NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात 4 कोटी 45 लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.


हेही वाचा – एनएसई घोटाळ्याशी संजय पांडेंचा काय संबंध?, वाचा सविस्तर