Friday, April 30, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे निधन

मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे निधन

Related Story

- Advertisement -

मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. ते अवघ्या ३४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉडीबिल्डर विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक लोक अद्यापही निष्काळजीपणे वावरताना दिसतात आपण फिट असल्याचे दाखले देतात. परंतु अवघ्या ३४ वर्षीय शरीराने फीड अशा बॉडीबिल्डरच कोरोनामुळे निधन झाल्याने बॉडीबिल्डर क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

जगदीश यांनी आपली कारकिर्द अगदी कमी वयात गाजवली होती. जगदीश यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्ण पदाचा मानकरी ठरले. इतकेच नव्हे तर मिस्टर इंडियामध्ये दोन वेळा सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दरम्यान मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन शिपमध्ये जगदीश यांनी कास्य पदकावर आपली मोहर उमटवली होती. दरम्यान राज्यातील अनेक बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये जगदीश यांनी भाग घेत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आज राज्यातील अनेक प्रसिद्ध बॉडीबिल्डर्समध्ये जगदीश यांचे नाव घेतले जाते.

- Advertisement -

दरम्यान बॉडीबिल्डींग क्षेत्रात आपले नाव कमावत त्यांनी बडोद्याला व्यवसाय सुरु केला होता. त्य़ांनी स्वत;चा मालकीची जिम सुरु केली होती. या जिमच्या कामानिमित्त जगदीश थोडे दिवस बडोद्याला स्थायिक झाला होते. परंतु येथेच त्यांना कोरोनाने गाठले आणि त्यांचे निधन झाले. मुंबई बॉडीबिल्डींग असोसिएशनसह महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशनने जगदीशच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.


 

- Advertisement -