घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातही कायदा आणि यंत्रणांचा दुरुपयोग; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातही कायदा आणि यंत्रणांचा दुरुपयोग; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक करण्यात आली होती. खेरा यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, महाराष्ट्रातही अशाचप्रकारे विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक करण्यात आली होती. खेरा यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, महाराष्ट्रातही अशाचप्रकारे विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (Misuse of laws and systems in Maharashtra too Raut slams Shinde Fadnavis government)

खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कायदा आणि यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. महाराष्ट्रातीलही विरोधी पक्षातील नेतेमंडळींना अशाचप्रकारे अटक केली जात आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि इतर राज्यांमध्ये विरोधकांवर अशाप्रकारे कारवाई करण्यात येत आहे. नुकताच आपण पाहिले असेल की, काँग्रेसच्या महाअधिवेशनच्या पूर्वसंध्येला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नजीक असणाऱ्या लोकांवर ईडीने छापेमारी केली. येथील काँग्रेसच्या नेत्यांवर छापेमारी केली जात आहेत”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहावर गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच, पवन खेरा यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीप्पणी केली होती. ‘वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती, मग नरेंद्र दामोदर दास मोदी यांना समिती स्थापन करण्यात काय अडचण आहे?’, असा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला होता. पवन खेरा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून खेरा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज खेरा यांना दिल्ली विमानतळावर प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.

संजय राऊत यांची भाजपावर टीका

‘पंतप्रधान या पदाचा आम्ही नेहमीच आदर ठेवतो. पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य करणे शक्यतो टाळली पाहिजेत. पण हा नियम फक्त विरोधकांसाठीच आहे का? कारण भाजपाचे नेतेमंडळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांसह अनेक नेत्यांवर अपशब्दांचा वापर करून टीका करतात’, असे संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – काँग्रेस नेते पवन खेरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -