Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोन्याची चैन दिलेल्या तरुणीला दिली नोकरी, एमके स्टालिन यांनी...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोन्याची चैन दिलेल्या तरुणीला दिली नोकरी, एमके स्टालिन यांनी वचन केलं पुर्ण

सौम्याला जेएसडब्लू स्टीलमध्ये नोकरी

Related Story

- Advertisement -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी तरुणीला नोकरीला लावून आपले वचन पुर्ण केलं आहे. तरुणीने मुख्यमंत्री सह्यायता निधीत सोन्याची चैन दिली होती. तामिळनाडूची आर.सौम्यानं कंप्यूटर सायंसमध्ये इंजीनियरिंगची पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. परिवाराच्या खर्चासाठी आणि परिवार चालवण्यासाठी संघर्ष करत आहे. परंतु संकटाच्या काळात मुख्यमंत्री स्टालिन तरुणीच्या मदतीला धावून जात आपल्या वचनानुसार नोकरी दिली आहे.

मागील वर्षात २२ वर्षीय सौम्याने पदवीप्राप्त केली आहे. पदव्युत्तर शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सौम्या कामाच्या शोधात आहेत. १२ जून रोजी मुख्यमंत्री एमके स्टालिन मेट्टूर धरणाच्या उद्घाटनासाठी घेलं होते. यावेळी सौम्याचा स्टालिन यांच्याशी संपर्क झाला होता. सौम्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोविड मदत निधीसाठी मुख्यमंत्री सहाय्यतामध्ये सोन्याची चैन दान केली होती. यावेळी स्टालिन यांनी सोम्याला नोकरी देण्याचं वचन दिलं होत.

सौम्याला सुवर्ण कन्येचा मान

- Advertisement -

मुख्यमंत्री स्टालिन यांनी सौम्याला नोकरी देण्याचे आश्वासन पुर्ण केले आहेत. त्यांनी सौम्या यांचे पत्र ट्विटरवर शेअर करत सौम्याच्या उदारपणाने त्याच्या ह्रदयाला स्पर्श केले असल्याचे स्टालिन यांनी म्हटलं आहे. तसेच सौम्याला पोंमल म्हणजेच सुवर्ण कन्या म्हणून संबोधला आहे. स्टालिन यांनी ट्विट केले आहे की, सौम्याचे पत्र लक्षात आले. संकटाच्या काळात मदत करण्याच्या हेतूने मन जिंकलं आहे. लवकरच तिच्या शिक्षणानुसार तिला नोकरी देण्यासाठी प्रयत्न केलं जाईल असे ट्विट मुख्यमंत्री स्टालिन यांनी केलं आहे.

सौम्याला जेएसडब्लू स्टीलमध्ये नोकरी

मुख्यमंत्री स्टालिन यांनी आपल्या वचनाला जागून सौम्याला जेएसडब्लू स्टीलच्या कंपनीत कामाला लावले आहे. तामिळनाडू ऊर्जा मंत्री वी.सेंथिल बालाजी यांनी सौम्याशी संवाद साधून तिला नियुक्ती पत्र दिले आहे. नोकरी मिळाल्यानंतर सौम्याने मुख्यमंत्र्यांना फोन करत आभार व्यक्त केला आहे.

- Advertisement -