Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी द्वेष आणि खोटेपणा सोडा, महाराष्ट्रहिताचं बोला; संक्रांतीच्या आदित्य ठाकरेंनी दिल्या हटके शुभेच्छा

द्वेष आणि खोटेपणा सोडा, महाराष्ट्रहिताचं बोला; संक्रांतीच्या आदित्य ठाकरेंनी दिल्या हटके शुभेच्छा

Subscribe

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. मुंबई आणि महाराष्ट्राला लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची लूट ही खोके सरकारने करायला सुरु केली आहे, असं म्हणत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकार निशाणा साधला होता. दरम्यान, आज मकर संक्रांतीच्या दिवशी आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा देत शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणामुळे रसरि बेताल विधानं होत आहेत. महापुरुषांचे अपमान होत आहेत. स्त्रियांचा अपमान होत आहे. सामाजिक वातावरण गढूळ होत आहे आणि या साऱ्यात जनतेचं प्रचंड नुकसान होत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

पुढे ठाकरे म्हणाले की, द्वेष आणि खोटेपणा सोडा, स्वच्छ राजकारणाने मनं जोडा, असं ट्वित करत ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय वातावरण, महापुरुष आणि स्त्रियांबद्दल केली जाणारं आक्षेपार्ह विधानं यावरून ठाकरेंनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे.

अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा

अकोला येथे उद्या शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत जाणार आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या कशा, असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

राज्याचा स्वाभिमान नाही. पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या कशा. नाही निर्मळ मन, काय करील साबण, असं तुकाराम महाराज म्हणतात. नाही निर्मळ मन, तर काय करील तीळगूळ, असं मी तयार केलं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -