Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी भारतीय नौदलाला मिळालेला ध्वज ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद - आशिष शेलार

भारतीय नौदलाला मिळालेला ध्वज ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद – आशिष शेलार

Subscribe

मुंबई: संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि भारतीय नौदलाला आज नवीन ध्वज मिळाला या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले.

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. या नवीन सूर्योदयाचा आज प्रत्येक भारतीय साक्षीदार झाला आहे.

- Advertisement -

आझादीच्या आंदोलनात क्रांतिकारकांनी एका सशक्त भारताचे स्वप्न पाहिले होते, तेच आज आपण अनुभवत आहोत. आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून या गोष्टी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

विक्रांत हे त्याचेच एक जिवंत चित्र – पीएम मोदी

आयएनएस विक्रांत राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा प्रमाण आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत ज्या सक्षम, समर्थ आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न पाहिले होते. विक्रांत हे त्याचेच एक जिवंत चित्र आहे, महासागर आणि आव्हाने अनंत असतील मात्र भारताचे उत्तर एकचं विक्रांत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विक्रांतचे अतुलनीय योगदान आहे.

नौदलाला गुलामगिरीतून मिळाले स्वातंत्र्य 

- Advertisement -

भारतीय नौदलाच्या ध्वजावर आजवर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे. आज 2 सप्टेंबर 2022 या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे, गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. जेव्हा विक्रांत आपल्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही तिथे तैनात असतील. महासागराची अफाट शक्ती, अफाट स्त्री शक्ती, ही नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.


- Advertisment -