केंद्राकडून मराठी माणसाला न्याय; एनटीसी, पुनर्विकासावर शेलारांची प्रतिक्रिया

Mumbai BJP President Ashish Shelar Receives Death Threat complaint filed in bandra police station

मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. म्हाडा मार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे. मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर देणारी घोषणा आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली त्यामुळे भाजपाच्या पाठपुराव्याला मोठे यश आले, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

मुंबईत एनटीसीच्या एकुण 11 गिरण्या असून या गिरण्यांच्या जागांवर असणाऱ्या चाळींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई महापालिकेने या चाळींना धोकादायक जाहीर केले आहे पण यांच्या पुनर्विकासाचे कोणतेही धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला होता. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संपर्क करून या चाळींचा पुनर्विकास व्हावा म्हणून पाठपुरावा करीत होते.

या चाळीचा पुनर्विकास 33(7) होणे अपेक्षित होते मात्र जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असलेल्याने केंद्र सरकारने त्याबाबत राज्य शासनला परवानगी देणे आवश्यक होते. त्यासाठी भाजपा आमदार अँड आशिष शेलार सातत्याने पाठपुरावा करीत होते. केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदही त्यांनी दिले होते.

या चाळींपैकी काही चाळींची जागा मिलमध्येच होती त्यामुळे त्यांची सीमा निश्चित करणे आवश्यक होते. तर यातील काही चाळी या उपकार प्राप्त नाहीत त्यामुळे या सगळ्या इमारतीच्या पुनर्विकासात अनेक अडचणी होत्या. आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या चाळींच्या पुनर्विकासाची योजाना तयार करून सादर करा केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल, त्यासाठी एक समिती ही गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासाचे मार्ग खूले झाले आहेत.

या चाळींमध्ये सुमारे 1892 कुटुंब असून गिरणी कामगारांची मराठी कुटुंब आहेत. त्यामुळे त्यांना त्याच जागी हक्काचे घर मिळायला हवे अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात येऊन राज्य शासनाशी चर्चा करुन पुनर्विकासाचे मार्ग खूले केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. म्हाडा मार्फत या रहिवाशांना घरे मिळतील गरिबांची काळजी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही आभार, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : बलात्काराचे भांडवल करण्याच्या प्रवृत्तीला चाप !