घरताज्या घडामोडीनवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

Subscribe

गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालायात धाव घेणार

राज्यात वाढत्या कोरोना परिस्थितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीरवरुन केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात केंद्र सरकारवर खोटे आरोप केले आणि खोटी अफवा पसरवल्यामुळे राज्य सरकारने नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्राला माल देऊ नये आणि दिल्यास परवाना रद्द करु असे धमकावल्याचे आरोप नवाब मलिक यांनी केले होते. केंद्राने एकूण १६ कंपन्यांना अशी धमकी दिल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. यामुळे मलिक यांनी खोटा आरोप करत आणि खोटी माहिती पसरवल्यामुळे राज्य सरकारमध्ये वाद निर्माण करुन राष्ट्रीय एकतेला तडा जाण्यासारखे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी अफवा पसरवल्यामुळे हजारो नागरिक महाराष्ट्र सोडून परदेशात परतत आहेत. जनता भयभीत झाली आहे. भयभीज झालेली जनता परदेशी परतत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरत आहे. त्यामुळे महामारी रोग अधिनियम,१८९७ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तक्रारीमध्ये केली आहे. तसेच गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालायात धाव घेणार असल्याचेही आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -