Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व, अतुल भातखळकरांची रोहित पवारांवर टीका

केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व, अतुल भातखळकरांची रोहित पवारांवर टीका

आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच - रोहित पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. केवळ पवार आडनाव एवढंच आपले कर्तृत्व आहे. अशा शब्दात आमदार अतुल भातखळकरांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल असे भातखळकरांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी नवीन संसद भवन नव्हे तर देशातील नागरिकांचे लसीकरण व्हावे असे म्हटले होते. लसीकरणावरुन गेल्या काहीदिवसांपासून राजकारण सुरु असून यावर आता दोन आमदारांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हटलंय अतुल भातखळकरांनी

राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी हे जरा अतीच नाही का रोहित पवार? केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल. असे ट्विट करुन आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांवर टीका केली होती.

- Advertisement -

रोहित पवारांचे लसीकरणावरुन वक्तव्य

युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी? केंद्र सरकारने यंदा आपले हक्काचे #GST चे २०८३३ कोटी ₹ बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४लाख इंजेक्शन्स मिळाले.

- Advertisement -

महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय? राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही. देशमुख साहेबांबाबत बोलायचं तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी पूर्ण होऊद्या. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोवर थोडा धीर धरत राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल. राजकीय वक्तव्य करण्याची ही वेळ नाही. इथं लोकांचे प्राण पणाला लागले आहेत हे विसरू नका असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले होते.

भातखळकरांच्या या ट्विटला दिले होते प्रत्युत्तर

मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवार जी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी अशा आशयाचे ट्विट आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देत केले होते.

- Advertisement -