कामगारांचे माध्यान्ह भोजन निकृष्ट, आमदार बांगर यांचा संताप अनावर…

कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. यानंतर आमदार बांगर यांचा संताप अनावर झाला.

MLA BANGAR

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. एका उपहागृहाची पाहणी करायला गेलेल्या बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चढला. यानंतर त्यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत असलेल्या सर्व कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र, हे मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे शिंदे गटाचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी समोर आणले. जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे जेवण न दिल्यामुळे आमदार बांगर यांनी व्यावस्थापकाला जाब विचारला. यानंतर त्यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.

कामगारांना भोजन पुरवण्याचे काम खासगी कंत्राटदारांकडे –

कामगारांना मध्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदाराकडे देण्यात आली असून संबंधित कंत्राटदाराकडून ती कंपनी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना दिले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. या प्रकरणामुळे बंडखोर आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत.

संजय बांगर झाले होते आक्रमक –

अधिवेशन सुरू असताना संजय बांगर हे शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर हिंगोलीत त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या सभेत बांगर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना इशारा दिला होता. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटले, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असे ते म्हणाले होते. त्याआधीदेखील हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाले होते.