घरमहाराष्ट्र'महानंद'वर प्रशासक नेमा, आमदार भाई गिरकरांची विधान परिषदेत मागणी

‘महानंद’वर प्रशासक नेमा, आमदार भाई गिरकरांची विधान परिषदेत मागणी

Subscribe

मुंबई – विधानपरिषदेत आमदार भाई गिरकर यांनी तारांकीत प्रश्नावेळी महानंदा दुध संस्थेच्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी महानंदावर प्रशासक नेमन्याची मागणी केली. या प्रश्नावरील चर्चेत काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार भाई जगताप, आमदार प्रविन दरेकर आणि आमदार महादेव जाणकर यांनी भाग घेतला. यावेळी मंत्री विख-पाटील यांनी बैठक घेऊन कारवाई केली जाईल असे उत्तर दिले.

आमदार भाई गिरकर यांनी  महानंद दुध संस्थेतील भ्रष्टाचार आणि कामगारांची दुरव्यावस्थेविषयी प्रश्नात मागणी केली. यावेळी त्यांनी महानंदा दुध संघावर प्रशासक नेमावा अशी मागणी केली. यावर महानंदाची स्थापन तालुका दूध संघाची अपेक्स बॉडी म्हणून करण्यात आली. महानंदा दुध संघ चांगल्या प्रकारे कार्यरत होता.  2004- 05 साली हा दुध संघ  8 लाख लिटर दुध संकलन करत होता. संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे यासंघाचे दुध संकलन 1 लाख 15 हाजर लीटरवर आले आहे. 5 टक्के दूध या संघाला घालने आवश्यक आहे. संघाचे संचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. हे प्रकरण गंभीर असून यावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले

- Advertisement -

सेतेज पाटील काय म्हणाले –

महानंदा ही मातृसंस्था आहे. गेल्या 10 ते 20 वर्षात ती तोट्यात आले. तालुक्यातील जिल्ह्यातील संघ अडचणीत आहे. पण राज्यात अमुलच्या तोडीला अनेक दुध संघ आहेत. महानंदा टिकली पाहीजे यासाठी प्रयत्न केले पाहीजेत  सगळ्या संस्थांना बरोबर घेऊन राज्याचा एक ब्रड तयार केला पाहीजे.  चुकीचे काही घडले असेल तर चौकशी केली पाहीजे. मात्र, अमुलचे अतिक्रमण कसे थाबवायचे याबाबत प्रश्न आहे.  यामुळे ही संस्था टिकली पाहीजे, असे सतेज पाटील म्हणाले

- Advertisement -

प्रविण दरेकर काय म्हणाले –

सगळ्या गोष्टीला जबाबदार संचालन मंडळ आहे. प्रशासकीय नफा वाढल्यामुळे संघ तोट्यात आहे.  प्रशासनाचा ढिसाळ पणा याला कारणीभूत आहे. यामुळे महानंदा संस्थेच्या अर्थिक गौरव्यावहार आणि धोरणात्मक निर्णय याची चौकशी झाली पाहीजे. अर्थिक पाहणी आहवालात जे समोर आले आहे, त्यानुसार कारवाई करावी. संचालक मंडळ कार्यरत राहीले तर संघ सुस्थितीत राहणार नाही. संघ सुस्थितीत येईपर्यंत प्रशासक नेमा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

भाई जगताप काय म्हणाले –

आपल्या देशात धवल क्रांतीच्या माध्यामातून इतर राज्यात विक्री करण्यावरचे बंधन काढण्यात आले. मात्र, खरेदी करायला बंधन आहेत. लिन सिजमध्ये हे दूध आम्ही आमच्या संस्थाच्या माथी मारतो. मदर डेअरी आणि अमूल यांना विक्रीला बंधन नाही. ऑफ सीजन आणि लीन सीजनमध्ये काय जबाबदाऱ्या देणार याबाबत तुम्ही निर्णय घेणार का, असा प्रश्न भाई जगता यांनी विचारला.तेसेच एकखाद्या दीवशी महानंदा खासगी झाल्याची घोषणा होईल, अशा आरोप त्यांनी केला.

राधाकृष्ण विखे पाटलांचे उत्तर –

यावर महानंदार चांगला ब्रॅड होता. सरकारचे अपत्य म्हणून त्याच्या मध्ये भ्रष्टांचारा करायचा असा काहींनी समज करून घेतला आहे.याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. शिवाय महानंदा खासगी करण्याची शासनाची कोणतीही भूमीका नाही. असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी एखाद्या राज्यातील संघाला महानंदा चालवायची इच्छा असेल तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल असे, त्यांनी सांगीतले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -