घरताज्या घडामोडीशिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणखी एका व्यक्तिला धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा धमकीचा फोन पहिला नसून अज्ञात व्यक्तींकडून वारंवार धमकीचे फोन येत असल्याचं सांगितलं जात आहे.

विकास गोगावले यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आहे. त्यावेळी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीवाळ करण्यात आली. धमकी देणाऱ्याने गोगावलेंना ४ ते ५ दिवसांचा इशारा दिला आहे. संबंधित धमकीच्या फोन प्रकरणी गोगावले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

- Advertisement -

मला गेल्या दोन दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. याशिवाय माझे वडील भरत गोगावले यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. तुम्ही पक्ष कसा वाढवतात ते आम्ही बघतो, असे धमकी देणारे बोलतात, अशी प्रतिक्रिया विकास गोगावले यांनी दिली आहे.

शिंदे गटाला धमकी देण्यात येणारी ही पहिली घटना नाहीये. याआधी आमदार बालाजी किणीकर यांनादेखील गोळी घालून जीवे मारण्याची धमकी आली होती. तसेच किणीकर यांना धमकीचे पत्र आले होते. दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर भयानक हल्ला झाला होता. या घटनेत त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, सामंतांना केंद्र सरकारची सुरक्षा आणि राज्यातील पोलिसांची सुरक्षा असल्याने ते थोडक्यात बचावले होते. मात्र, या धमकीच्या फोननंतर आता शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार समोर येताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी; लवकरच राहण्यास जाण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -