‘शिंदे-फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला आहे की…’, प्रताप सरनाईकांचे मंत्रिमंडळ विस्तारावर सुतोवाच

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन करत 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला. परंतु, या विस्तारात शिंदे गटाच्या बहुतांशी आमदारांचा आणि भाजपाच्या आमदारांचा समावेश न झाल्याने आमचा नंबर केव्हा लागणार असा सवाल शिवसेना (शिंदे गट) व भाजपाच्या प्रत्येक आमदाराला पडला होता. अखेर हा मंत्रिमंडळाचा विस्तार मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेच्या अडीच वर्षांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. यावेळी शिवसेनेच्या 40 आमदारांनीही शिंदे गटात समावेश केला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. परंतु, हा विस्तार अर्धवट असल्याने आमचा नंबर केव्हा लागणार असा सवाल शिवसेना (शिंदे गट) व भाजपाच्या प्रत्येक आमदाराला पडला होता. अखेर हा मंत्रिमंडळाचा विस्तार मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.

मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल’, असा दावा केला. (MLA Bharatshet Gogawale MLA Pratap Sarnaike MLA Sanjay Shirsat Eknath Shinde Devendra Fadnavis Cabinet Expansion)

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे आम्हाला कोटासह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. कालही त्यांनी याबाबत सांगितलं आहे. थोडी फार संकटं होती तीही दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. ते नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार करतील”, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

संजय शिरसाट यांचे नाव चर्चेत

एकीकडे प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबतचा दावा तर, दुसरीकडे औरंगाबाज पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला बातम्या पाहून असं वाटतं होतं की, मंत्रिमंडळातलं माझं स्थान लटकलेल्या अवस्थेत आहे”, असे संजय शिरसाट म्हणाले.

तसेच, “मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलंय काय? उलट तिकडे जे 16 आमदार आहेत ते शिंदे साहेब त्यांना बोलावण्याची वाट बघत आहेत. शिंदे साहेबांनी बोलावलं तर ते कधीही वर्षा बंगल्यावर दिसतील. पण शिंदे साहेब म्हणतात आधी आमचं आम्हाला बघुद्या, त्यांना कशाला उगाच बोकांडी बसवून घ्यायचं”, असा टोलाही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मी 100 टक्के शपथ घेणार – भरत गोगावले

‘या मंत्रिमंडळ विस्तारात मी 100 टक्के मंत्रिपदाची शपथ घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे मला आश्वासन दिले आहे. या आठ ते दहा दिवसात मंत्री मंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री शिंदे हे अडचणीत दिसले तेंव्हा आम्ही थोडे पाठीमागे थांबलो”, असे भरत गोगावले म्हणाले. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

16 अपात्रांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. हे प्रकरण जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात होते. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता असे बोलले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या निकालाबाबतच्या सुनावणीवेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला. त्यामुळे आता 16 आमदार अपात्र ठरणार का? याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार नवा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या चर्चांनुसार, नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – सिंदखेडाराजा अपघातातील मृतांच्या वारसांना एसटीतर्फे 10 लाख रुपयांची आर्थिक मदत