घरमहाराष्ट्रMLA Disqualification : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर 'या' दिवशी होणार मॅरेथॉन सुनावणी

MLA Disqualification : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर ‘या’ दिवशी होणार मॅरेथॉन सुनावणी

Subscribe

आज विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी दोन गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. परंतु, आता या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांकडून मॅरेथॉन सुनावणी करण्यात येणार असून याचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यला व्हीप मिळाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र त्यावर ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु,  याप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. परंतु, आता या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांकडून मॅरेथॉन सुनावणी करण्यात पार पडणार आहे. यासाठीचे नवीन वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले आहे. तर, आजच्या दिवसातील सुनावणी ही संपली असून उद्या (ता. 22 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता पुन्हा या सुनावणीला सुरुवात होणार आहे. (MLA Disqualification: A marathon hearing will be held on disqualification case of Shiv Sena MLAs)

हेही वाचा – MLA Disqualification Case : दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी; नार्वेकर वैयक्तिक टिप्पणीवर नाराज

- Advertisement -

आजच्या सुनावणीमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. आजच्या कामकाजामध्ये शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी दिवसभराच्या सुनावणीत ठाकरे गटाचे विधीमंडळ व्हीप सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. मात्र, प्रभूंनी सुद्धा मोठ्या संयमाने जेठमलानींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पण आता, उद्यापासून म्हणजेच बुधवार 22 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. तर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 3 डिसेंबर या दिवशी रविवार आलेला असतानाही त्या दिवशी देखील सुनावणी पार पडणार आहे.

यापुढे होणाऱ्या सुनावणीमध्ये आता दोन्ही गटातील आमदारांच्या साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्याशिवाय, व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष‌ ‌नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी दाखल केलेल्या 34 याचिकांचे सहा गट करून सध्या सुनावणी घेण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 डिसेंबरपर्यंतची सुनावणीची तारीख देण्यात आली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सध्या राहुल नार्वेकर अॅक्शन मोडवर आले आहेत. लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने राहुल नार्वेकरांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आजपासून पुढील तीन दिवस विधिमंडळात सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -