घरमहाराष्ट्रMLA Disqualification : ठाकरे गटाचे प्रतोद प्रभूंची उलट तपासणी; अवघड प्रश्नांना दिले...

MLA Disqualification : ठाकरे गटाचे प्रतोद प्रभूंची उलट तपासणी; अवघड प्रश्नांना दिले सोपे उत्तरं

Subscribe

दिसभराच्या सुनावणीनंतर विधानभवनात बाहेर पडलेले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज मंगळवारी (20 नोव्हेंबर) रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंना अवघड प्रश्न विचारले. मात्र यावेळी प्रभूंनी त्या अवघड उत्तरांना सोप्या पद्धतीने उत्तरे दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी सकाळी साडे अकरा वाजतापासून होणार आहे. (MLA Disqualification  Pratod Prabhus cross examination by Thackeray group Simple answers to difficult questions)

दिसभराच्या सुनावणीनंतर विधानभवनात बाहेर पडलेले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुनील प्रभूंच्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांना आजच्या सुनावणीत प्रश्न विचारण्यात आले. त्यांची त्यांनी पद्धतशीरपणे उत्तरे दिली आहेत. परंतू सुनावणी आधीच त्यांनी सांगितले होते की, मी मराठीत उत्तरं देईल. कारण, इंग्रजित जे टाइप झाले आहे त्यातील काही शब्द जर माझ्या नजरेतून सुटले तर त्याचा अर्थ जर नीट लागला नाही तर अडचणीचे होईल म्हणून मी मराठीतच उत्तरं देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुनावणीवेळी जेव्हा सुनील प्रभू मराठीत सांगत असताना ते जशाच्या तसं इंग्रजित जात नाही हे जेव्हा लक्षात आलं म्हणून आमच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला आणि सुनील प्रभूंचे म्हणणं मराठीत नोंदवून घ्यावं असं ठरलं. त्यानंतर पुढील सुनावणी सुरू झाली. तेव्हा आम्ही ऑफिसीयल ट्रान्सलेटर घ्या अशी मागणी केली जेणेकरून जसच्या तसं अध्यक्षासमोर जाईल आणि पुढील सुनावणीवेळी त्याचा योग्य अर्थ निघेल. अशी माहिती परब यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : पाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही…; मराठवाडाच का धुमसतोय?

सुनावणीवेळी काय घडले?

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी केली. जेठमलानी यांनी प्रभूंना विचारलेल्या काही महत्वाचा प्रश्नांपैकी एक म्हणजे तुम्ही या व्यासपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र इंग्रजी भाषेत सादर केले आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी तुम्ही जे शपथपत्र सादर केले, ते सुद्धा इंग्रजीत आहे हे सत्य आहे का? यावर प्रभू यांनी हो खरं आहे ते रेकॉर्डवर आहे. असे उत्तर दिले. त्यानंतर जेठमलानी यांनी दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नांपैकी एक आणखी प्रश्न विचारला की, 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या युतीत आपण निवडणूक लढवली होती का? यावर प्रभू यांनी मला शिवसेना माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यावर मी निवडणूक लढलो. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मी निवडणूक लढलो. तर याचवेळी ठाकरे गटाचे वकील कामत यांनी जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नावर आक्षेपही घेतला होता. यानंतर तिसऱ्या महत्वाच्या प्रश्नापैकी जेठमलानी यांनी आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला. तो असा की, प्रचारात मोदी, शहा आणि फडणवीस यांचा फोटो पोस्टरवरती फोटो वापरला का? यावर प्रभू यांनी उत्तर दिले की, मला या संदर्भात फार आठवत नाही. मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो होता. यासह असे असंख्य प्रश्न जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना विचारले मात्र, सुनील प्रभू यांनी या प्रश्नांना सहजतेने उत्तरे दिली.

- Advertisement -

हेही वाचा : राज्याचे गृहमंत्री फडणवीसांसह आणखी एका मंत्र्याला दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी

जे प्रश्न जेठमलानींकडून विचारण्यात आले असंयुक्तिक- सरोदे

आज झालेल्या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वकिली व्यवसायात असतानाचा माझा अनुभव आहे त्याच्यानुसार साक्षी पुरावे घ्यायला नको तशा पद्धतीने साक्षी पुरावे घेतात हे लक्षात येते. त्यावर अनेकदा आक्षेप घेण्यात आले की, जे प्रश्न विचारणं आवश्यक नाही तसे प्रश्न विचारण्यात येत आहेत. विलंब लावण्याचे हे टेक्निक असू शकते, असे लक्षात आले. विटनेस काही सांगत असताना त्याच शब्दांमध्ये नोंद घेण्यात आवश्यक असते पण तसे महत्वाचे शब्द नोंदविण्यात आले नाही हे आमच्या लक्षात आले. यावेळी थोडा वादविवाद देखील झाला. विरोधी पक्षाचे लोक, कामकाज चालवणारे सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांना टार्गेट करतात तुम्हीच एव्हिडन्स लीड करतात आणि एव्हिडन्सला शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा ते म्हणतात चुकीची प्रक्रिया आहे. हे चुकीचं आहे असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -