घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहिजेच, कायद्यानुसार हेच योग्य, एकनाथ खडसेंचा सल्ला

उद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहिजेच, कायद्यानुसार हेच योग्य, एकनाथ खडसेंचा सल्ला

Subscribe

राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गट आणि भाजपला सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आधीच्या काळी पक्षांमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वेगळे झाले. काँग्रेस फुटली. मात्र, कायदा त्यावेळी वेगळा होता. आताच्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. सध्या शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. ज्या पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे आहे आणि ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश मानले पाहीजेच कारण हे कायद्यानुसार योग्य आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

शिंदे गट आम्ही शिवसेनेतच असल्याचे सांगत आहे. मग असे असेल तर उद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहीजेच, कायद्यानुसार हेच योग्य आहे, असं खडसे म्हणाले. बंडखोर फुटलेल्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यापासून सूट हवी आहे. त्यांनी जर असं म्हटलं की, आम्ही शिवसेनेपासून वेगळो झालोत. तर ते आजच अपात्र ठरतात किंवा त्यांना भाजपा, मनसे, प्रहार अशा कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल. परंतु पक्षात विलीन व्हायच्या आधी अपात्रता टाळायची असेल तर त्यांना आम्ही शिवसेनेतच आहोत, असं सांगावं लागतंय.

- Advertisement -

खरी काँग्रेस कुणाची असा वाद इंधिरा गांधी यांच्या कालखंडात निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी चिन्ह गोठवले होते आणि दोघांनाही वेगळे चिन्ह दिले होते. मात्र, ज्यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांच्याच पक्षाचा निर्णय घेण्यात आला होता. आजही अशाच प्रकारची परिस्थिती दिसत आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असं खडसे म्हणाले.


हेही वाचा : अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल, राहुल गांधींचा हल्लाबोल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -