पवारांचे वय झाले असेल, तर त्यांनी घरी बसावे, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

वीज बिल आकारले जाते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा घणाघात आमदार पडळकर यांनी केला.

ST Workers Strike bjp mla gopichand padalkar target to sharad pawar after met devendra fadnavis

आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पवारांचे वय झाले असेल, तर त्यांनी घरी बसावे. महाविकास आघाडीचे जनक म्हणून मिरवून घेताना कौतुक वाटते. मग शेतकर्‍यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. यावरून पुन्हा एकदा वादंग सुरू झाला आहे.

शेतकरी परिषदेच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या आमदार पडळकरांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पडळकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. आता मात्र मोफत वीज तर सोडाच, पण या भारनियमनातून मुक्त करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. केवळ विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने यंदाचा रब्बी हंगाम शेतकर्‍यांच्या हातून गेला आहे. मिटर बंद असतानाही ग्राहकांना