घरCORONA UPDATEनगर जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण

नगर जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण

Subscribe

कोरोनाचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असून आता आमदार देखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाला दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालामध्ये २४ नवे रुग्ण आढळले होते. दरम्यान, रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात पुन्हा दहा रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यात सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे. या आमदारावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात आत्तापर्यंत काही आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील या आमदाराची भर पडली आहे. बाधित झालेले नगरमधील हे पहिलेच आमदार आहेत. नगरस्थित असलेले हे आमदार जिल्ह्यातील एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एका कोरोनाबाधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले होते. तसेच त्यांनी कोरोनाची तपासणीदेखील करुन घेतली. रात्री त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या संपर्कातील अधिकाऱ्यांचीदेखील तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. संबधित आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या आमदारांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतील एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले होते. तत्पुर्वी आमदारांनी एका आंदोलनात देखील सहभाग घेतला होता.

नगरमध्ये ८५ वर्षीय वृध्देसह १६ रुग्णांची कोरोनावर मात

दरम्यान, नगर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यत आमदारासह तब्बल ३४ जण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५३३ वर गेला. तर शनिवारी सकाळी संगमनेरच्या कुरणमधील एका ८५ वर्षीय वृद्धेने कोरोनावर मात केल्याने तिला घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या सोळा जणांत संगमनेर आणि श्रीगोंद्यामधील प्रत्येकी तीन, नगरमधील पाच, राहाता तालुक्यातील दोन आणि पारनेर, श्रीरामपूर आणि कोपरगावमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३८५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्ता १४४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -