Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Sharad Pawar : आमदार म्हणजे पक्ष नव्हे, शरद पवारांचा अजित पवार गटाला...

Sharad Pawar : आमदार म्हणजे पक्ष नव्हे, शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या दोन गट असल्याने साहाजिकच या पक्षामध्ये फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. परंतु, आमच्या पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे वारंवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे तसेच इतर नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (ता. 25 ऑगस्ट) कोल्हापुरातील दसरा मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता 82 व्या वर्षी शरद पवार यांनी पक्षाला नव्याने उभारणी देण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी आता शरद पवार पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून शरद पवारांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यांच्या नेतृत्वातील तिसरी सभा ही काल कोल्हापुरात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज विराजमान होते. त्यामुळे आता शाहू महाराज हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – एकीकडे आपण चंद्रावर, दुसरीकडे महागाईने त्रस्त; शरद पवारांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या दोन गट असल्याने साहाजिकच या पक्षामध्ये फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. परंतु, आमच्या पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे वारंवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे तसेच इतर नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट देखील आम्ही सगळे एक आहोत, असा दावा करताना दिसून येत असतात. परंतु आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी पक्ष फुटीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. कोल्हापुरातून आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांनी पक्ष फूटीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत बोलताना उत्तर दिले की, आमदार म्हणजे पक्ष नव्हे. (MLA is not a party, Sharad Pawar’s Ajit Pawar’s attack on the group)

कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्ष म्हणजे देश पातळीवर ज्याच्या हातात संघटना आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हे. पक्ष म्हणजे संघटना. त्यामुळे या ठिकाणी पक्ष संघटनेचे राज्याचे अध्यक्ष हे जयंत पाटील आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. तीन महिन्यांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाचे सल्ले घेत होता किंवा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाचे सल्ले घेत होता? त्याहीपेक्षा आमच्यातून काही आमदार बाजूला झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा त्यांना पक्षाचा अध्यक्ष कोण हे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी शरद पवार असे सांगितले. त्यामुळे पक्षातून काही आमदार बाहेर पडले, तर तो पक्ष नव्हे असे स्पष्टपणे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -