या मंत्री, आमदार, खासदारांनी थकवले लाखो रुपयांचे लाईट बील, या मंत्र्याकडे आहे सर्वाधिक थकबाकी

राज्याच्या समृद्धीची सूत्र आहेत ते मंत्री, आमदार, खासदारच विजेचे बील भरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

or 6 hours in dombivli maharashtra

राज्यभरात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलबरोबरच घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने सामान्य जनता हैराण झालेली असतानाच ज्यांच्या हातातच राज्याच्या समृद्धीची सूत्र आहेत ते मंत्री, आमदार, खासदारच विजेचे बील भरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीजबित थकवणारी ही राजकीय मंडळी एक दोन नसून चक्क ३७२ जण आहेत. त्यांच्याकडे एक कोटी २७ लाखांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

उर्जा विभागानेच या थकीत वीजबिलधारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळींचे नाव आहे. मात्र सर्वाधिक वीज बील थकवण्यात भाजप साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे अग्रस्थानी आहेत. त्ंयाच्याकडे तब्बल ७ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. मात्र असे असूनही यापैकी कोणाही मंत्र्यावर अद्याप महावितरणाने कारवाई केली नाही. यामुळे सामान्य जनतेला वेगळा न्याय आणि मंत्र्यांना वेगळा न्याय का असा सवाल नागरिक करत आहेत.

या राजकीय मंडळींनी थकवली वीजबिले

आमदार जयकुमार गोरे – ७ लाख रुपये

आरोग्यमंत्री राजेश टोपे – ४ लाख रुपये

आमदार नाना पटोले २ लाख ६३ हजार रुपये

माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख २ लाख २५ हजार रुपये

माजी खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती १ लाख २५ हजार रुपये

माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख – ६० हजार रुपये

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात १० हजार रुपये

राज्यमंत्री विश्वजित कदम – २० हजार रुपये

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ७० हजार रूपये

आमदार समाधान आवताडे एकूण – २० हजार रुपये

आमदार राजेंद्र राऊत – ३ लाख ५३ हजार रूपये

खासदार रणजितसिंह निंबाळकर – ३ लाख रुपये

आमदार संग्राम थोपटे – १ लाख रुपये

माजी खासदार प्रतापराव जाधव – १ लाख ५० हजार रुपये

आमदार सुहास कांदे ५० हजार रुपये

आमदार रवी राणा – ४० हजार रुपये

आमदार वैभव नाईक – २ लाख ८० हजार रुपये

माजी मंत्री विजयकुमार गावित ४२ हजार रुपये

माजी आमदार शिरीष चौधरी – ७० हजार रुपये

मंत्री संदीपान भुमरे – १ लाख ५० हजार रुपये

खासदार रजनीताई पाटील- ३ लाख रुपये

आमदार प्रकाश सोळंके – ८० हजार रुपये

आमदार संदीप क्षीरसागर – २ लाख ३० हजार रुपये

राज्यमंत्री संजय बनसोडे – ५० हजार रुपये

आमदार अशिष जयस्वाल – ३ लाख ३६ हजार रुपये

आमदार महेश शिंदे ७० हजार रुपये

माजी मंत्री सुरेश खाडे – १ लाख ३२ हजार रुपये

सदाभाऊ खोत – १ लाख ३२ हजार ४३५ रुपये