घरताज्या घडामोडीराष्ट्रपती निवडणूक: शिंदे गटाला मोठा धक्का, एका आमदाराच्या मतदानावर बंदी

राष्ट्रपती निवडणूक: शिंदे गटाला मोठा धक्का, एका आमदाराच्या मतदानावर बंदी

Subscribe

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील विधानसभेत हे मतदान सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक मोठा धक्का बसला आहे. शिंदेगटातील आमदार महेंद्र दळवी यांना मतदान करता येणार नाहीये. कारण एका गुन्ह्यात ते आरोपी असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाहीये.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील २८८ पैकी २८३ आमदार मतदान करू शकणार आहे. आमदार अनिल देखमुख आणि नवाब मलिक हे तुरूंगात असल्याने त्यांना मतदान करता येणार नाहीये. तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने ते मतदान करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शिवसेनेतील एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे २८३ आमदारांना मतदान करता येणार आहे.

- Advertisement -

काय आहे तक्रार?

आमदार महेंद्र दळवी हे शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत. अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षांपूर्वी मारहाण प्रकरणात शिक्षा दिली होती. यावेळी निवडणुकीवरून दोन गटात तीन वर्षांपूर्वी हाणामारी झाली होती. यामध्ये एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. महेंद्र दळवी यांच्यासह अन्य तिघांना दोन वर्षांचा कारावास असा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल १३ मे रोजी आला होता. परंतु या प्रकरणी दळवी यांच्याकडून आता पुढील पर्यायांची चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदानावर बंदी घालण्यात आली आहे.

काँग्रेसच्या आमदारावर आक्षेप

भाजपच्या एका आमदारांनी काँग्रेसच्या आमदारावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे मतदान होणाऱ्या सभागृहात ३० मिनिटं आधी गेले कसे?, आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. मात्र, नितीन राऊत हे अर्धा तास मध्ये जाऊन बसले होते.त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं. अशी तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असं भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रपतीपद निवडणूक : नितीन राऊतांच्या मतदानावर लोणीकरांचा आक्षेप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -