घरमहाराष्ट्र''सहकाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार'' जिल्हा बँक स्वीकृत संचालकपदी आमदार नितेश राणेंची...

”सहकाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार” जिल्हा बँक स्वीकृत संचालकपदी आमदार नितेश राणेंची नियुक्ती

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये 19 संचालक निवडून आलेत. तर अन्य दोन तज्ज्ञ व्यक्ती या स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्या जातात. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शुक्रवारी आमदार नितेश राणे आणि बँकेचे माजी संचालक प्रकाश मोरये यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोरये यांची निवड झालीय. सहकाराच्या माध्यमातून जिल्हा विकासाची गती वाढविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडू, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये 19 संचालक निवडून आलेत. तर अन्य दोन तज्ज्ञ व्यक्ती या स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्या जातात. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शुक्रवारी आमदार नितेश राणे आणि बँकेचे माजी संचालक प्रकाश मोरये यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली.

- Advertisement -

यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली, यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची नवी संधी आपल्याला लाभली आहे. जिल्हा विकासाची गती वाढविण्यासाठी देण्यात आलेली ही महत्त्वाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे मत व्यक्त केले.

जिल्ह्यातील शेतकरी, तरुण वर्ग आणि महिला वर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला निवडून आणण्यासाठी ताकद देणाऱ्या भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेत मानाचे स्थान राहील. त्यांची कामे अग्रक्रमाने करण्यासाठी प्रयत्न राहतील. जिल्हा बँकेत ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्या तरुणांपर्यंत पोहोचवल्या जातील. तसेच तरुणांच्या हातांना काम कसे देता येईल, यासाठी आपले प्रयत्न राहतील.

- Advertisement -

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते, तशी ती तरुणांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या तरुणांना सुरुवातीचे भांडवल उभे करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत हे भांडवल उभा करण्यासाठीच्या अनेक योजना कार्यान्वित असून, त्या माध्यमातून तरुणांना फायदा कसा करून देता येईल यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तरुणांना स्टार्टअप करण्यासाठी आपली जिल्हा बँक प्रयत्न करत राहील. यापूर्वी जिल्हा बँकेत नोकऱ्या या पक्षातील कोणालाही न विचारता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्या जात होत्या, असा आरोप आमदार राणे यांनी यावेळी केला.

यापूर्वी नियुक्त झालेले आणि सध्या टेम्पररी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रात सहकार खाते सांभाळणारे अमित शहा यांच्याशी चर्चा करून त्यांना कायम करण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न राहतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात नोकरी गेल्याने अनेक चाकरमानी गावाकडे परतलेत. ज्यांना आता गावाकडे व्यवसाय करायचा आहे. त्यांच्यासाठी काही योजना आणता येतील का? तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

”सहकाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार” जिल्हा बँक स्वीकृत संचालकपदी आमदार नितेश राणेंची नियुक्ती
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -