घरताज्या घडामोडीNitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल, जामिनाबाबत दोन्ही बाजूंचा...

Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल, जामिनाबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

Subscribe

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उद्या(बुधवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे नमूद केले आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकीलांनी त्यांचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. या खटल्यात सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत आणि भुषण साळवी हे कामकाज पाहत आहेत. तर नितेश राणेंच्या बाजूने वकील संग्राम देसाई आणि सतीश मानेशिंदे हे बाजू मांडत आहेत.

जामिनाबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

दोन्ही पक्षांचा जामिनावर युक्तिवाद झाला. आमच्याकडून जामीनासाठी जोरदार विरोध करण्यात आला. आरोपी सहकार्य करत नसल्यामुळे आमचे मुद्दे तपासण्यात आलेले नाहीयेत. तसेच दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. आरोपांकडून कागद पत्राबद्दल आम्हाला जी माहिती घ्यायची आहे. ती माहिती घेण्याचं काम अद्यापही आमचं सुरू आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी सध्याची वेळ नाहीये. तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहार दृष्टीपातळास आलेले आहेत. ते आम्ही तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करणार आहोत. तसेच राणेंना जामीन मिळणार की नामंजूर होणार, याबाबत न्यायालय उद्या निर्णय घेणार असल्याचं प्रदीप घरत यांनी म्हटलंय.

- Advertisement -

नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला तेव्हापासून सरकारी वकील विविध गोष्टींत वेगकाढूपणा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच दुसऱ्या न्यायालयासमोर सुनावणी घेण्यासाठी केलेला अर्ज बरखास्त करा, अशा मागणीही करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेत हा अर्ज न्यायालयाने रद्द केला.

छातीवर गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला – प्रदीप घरत

- Advertisement -

अंगावर गाडी घालून पाडल्यावर संतोष परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली, संतोष परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट आल्याचा प्रदीप घरत यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. सीसीटीव्हीमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालंय दरम्यान न्यायाधिशांनी दोन्ही बाजू समजून घेत प्रत्यक्ष जामीन अर्जावरील सुनावणी ऐकून घेत याबाबतचा निर्णय उद्या होईल असे जाहीर केले.

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नितेश राणेंना सुरुवातीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोठडीत असताना तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परंतु जामिनाबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल देण्यात येणार आहे.


हेही वाचा : Uttarakhand Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडच्या नागरिकांना दिली आश्वासनं, विरोधकांवर साधला निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -