घरमहाराष्ट्रबंडखोरीमागे नाव एकनाथ शिंदेंचे, पण हे भाजपचे षडयंत्र - आमदार नितीन देशमुख

बंडखोरीमागे नाव एकनाथ शिंदेंचे, पण हे भाजपचे षडयंत्र – आमदार नितीन देशमुख

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगळे वळण लागले आहे. शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख परत आले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांना परत येण्याचे आवाहन केले. ईडीच्या भितीने सर्व आमदार गेले आहेत. या बंडखोरीमागे नाव एकनाथ शिंदे यांचे आहे, पण हे षडयंत्र भाजपचे आहे, असा दावाही नितीन देशमुख यांनी केला.

गटनेत्यांनी बैठक बोलावली म्हणून मी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह एकनाथ शिंदेंकडे गेलो. आम्हाला माहित नसताना गुजरातकडे नेले जात होते. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील पळालेत. गुजरातच्या हॉटेलला छावणीचे रुप आले होते. 250 ते 300 पोलिसांचा ताफा होता. त्यात आयपीएस अधिकारीही होते. या हॉटेलमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज, आमदार संजय कुटे होते. यावेळी मला भाजपने एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र रचल्याची कल्पना आली. पोलिसांसोबत वाद झाले. मी तेथून पळ काढला. आपल्याला पळ काढल्यानंतर एका गाडीत टाकण्यात आले. मला काहीच झालेले नसताना गाडीत टाकण्यात आले आहे. दवाखान्यात डॉक्टरने अटॅक आलेला नसतांनाही तसे सांगण्यात आले, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये नेऊन इंजेक्शन  दिले –

याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिले जात नव्हते. तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असे सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेले. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचे षडयंत्र करायचे होते. मला काही झाले नसताना इंजिक्शन देऊन घातपात करण्याचं षडयंत्र होते, असे ही आमदार नितीन देशमुख म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -