प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव; कॅबिनेटमध्ये होणार निर्णय

आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच स्कूल बस मालकांना लॉकडाऊन काळात आर्थिक तोटा झाला आहे. यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी वार्षिक वाहन करात १०० टक्के सवलत मिळण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

pratap sarnaik building waive penalty proposal in maha vikas aghadi government cabinet meeting

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदार सरनाईकांवर राज्य सरकर मेहरबान असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. केवळ दंड माफ करण्याचा प्रस्ताव नाही तर ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीला भोगवाटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश महानगरपालिकाला देण्याची शक्यता आहे. यामुळे या निर्णयामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टिकास्त्र डागण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार असून महत्त्वाच्या कामांना मंजूरी देण्यात येणार आहे. यामध्ये ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर विरोधकांकडून कडाडून विरोध होण्याची देखील शक्यता आहे. इमारतीच्या दंडाबाबतच नाही तर या इमारतीला भोगवाटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशसुद्धा बैठकीत घेणार असल्याचे समजते आहे. तसेच महानगरपालिकेला भोगवाटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे कळते आहे. शिवेसनेकडून एक आमदारासाठी असा निर्णय पहिल्यांदाच घेतला जाईल. यामुळे जर असा निर्णय झाला तर विरोधकांकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक खास होणार आहे. अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईकरांसाठी नववर्षाचे गिफ्ट असलेले, मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांची करमाफीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच मंजूरी मिळणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच स्कूल बस मालकांना लॉकडाऊन काळात आर्थिक तोटा झाला आहे. यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी वार्षिक वाहन करात १०० टक्के सवलत मिळण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येईल.


हेही वाचा : ‘ते फक्त त्यांचे मत’ तुमचे नशीब नाही’, संजय राऊतांचा निशाणा नेमका कोणावर?