घरठाणेबेकायदा बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा, आमदार राजू पाटलांची मागणी

बेकायदा बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा, आमदार राजू पाटलांची मागणी

Subscribe

डोंबिवली : डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम परवानगी घोटाळा प्रकरणात बिल्डरांसह जमीन मालकांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत. त्यांची देखील चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. तसेच या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमदार राजू पाटील यांनी पत्र दिले होते.

या घोटाळ्यात आतापर्यंत ६५ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ५ जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. मात्र हि बांधकामे एका दिवसात झालेली नाहीत. त्यामुळे ज्या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच अधिकारी देखील जबाबदार आहेत. म्हणूनच महापालिकेच्या संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दोषी ठरवण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.

- Advertisement -

पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार गीता जैन,संजय केळकर आदी उपस्थित आमदार खासदारांनी देखील पाठिंबा दिलाआहे. तसेच वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा विषय येऊन सुद्धा योग्य कारवाई होत नसल्याने आमदार या बैठकीत आक्रमक झाले होते. त्यामुळे आता पालकमंत्री या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या मागे देखील चौकशीचा फेरा लावणार का ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 या बैठकीत आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीच्या २७ गावातील ४९९ सफाई कामगारांना कायम  करून घ्यावे. अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान असल्याने प्रवाश्यांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करून तातडीनं रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या करण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारची केडीएमसीची सुविधा न घेणाऱ्या पलावा सिटी मधील राहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी महापालिका करत आहे.

- Advertisement -

येथील नागरिकांनी १५ कोटी पेक्षा अधिक कराची रक्कम जमा केली आहे .ती रक्कम व्याजासहित परत मागितली जाण्याआधीच येथील नागरिकांची करातून सुटका करण्याचा लवकरच निर्णय घ्या.२७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. याचे भान ठेवून हे काम जलदगतीने करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या मागणीला तातडीने पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिसाद देत मंत्रालयीन दालनात तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा : इंदू मिलमध्ये इंटरनॅशनल रिसर्च सेंटर सुरू करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -