घरताज्या घडामोडीआमदार रवी राणांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल

आमदार रवी राणांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल

Subscribe

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक शामसुंदर निकम आणि रेडीएंटचे संचालक काकाणी यांनी राणा यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. परंतू प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आज तातडीने रेडीएंट रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

युवा स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या प्रकृती अचानक खालावली. शनिवारी त्यांना अमरावती येथील रेडीएंट रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांना किराणा माल देण्यासाठी आमदार रवी राणा स्वत: घरोघरी जात होते. यामुळे त्यांना काल अंगदुखीचा त्रास जाणवला. शिवाय, त्यांना ताप देखील आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

आमदार रवी राणा यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर निष्णात डॉक्टरांच्या टीमने तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने, युरीन सँपल तपासणीकरीता नागपूर येथे पाठवले आहेत. तथापि, आमदार राणा अनेक लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने देखील घेण्यात आले. यासह, उद्या त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. रेडीएंट रुग्णालयाचे डॉक्टर आनंद काकाणी, सिकंदर अडवाणी, पवन अग्रवाल आदी डॉक्टरांचे पथक राणा यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, आमदार राणांसाठी रेडीएंट रुग्णालयाचा चौथा मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला. शिवाय, मजल्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेले ९ जण कोरोनाबाधित


अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक शामसुंदर निकम आणि रेडीएंटचे संचालक काकाणी यांनी राणा यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. परंतू प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आज तातडीने रेडीएंट रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबतची माहीती खासदार नवनीत रवी राणा यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -