…म्हणून वेदांता पुन्हा राज्यात येण्याची शक्यता – रोहित पवार

rohit pawar

अहमदनगर – सध्या वेदांतावरून राजकारण सुरू आहे. प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. . याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता, लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांता प्रकल्प महाराष्ट्रबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नाही. हा प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाशी सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हाणाले.

आमदार रोहित पवार काय म्हणाले? –

रोहित पवार यांनी वेदांता प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली. वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा आवडली होती. त्यांना सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, तरीही प्रकल्प गुजरातला गेला.

गुजरातमध्ये त्यांना जी जागा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे, ती जागा त्यांना आवडलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राम शिंदेवर टीका –

यावेळी रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांच्यावर टीका केली.  त्यांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्याचे चॅलेंज दिले होते. मी त्यांचे चॅलेंज स्विकारले देखील. मात्र, आपण दोघेही राजीनामा देऊ असे मी त्यांना म्हटलो. त्यानंतर ते त्याबाबत एकही शद्ब बोलले नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.