घरताज्या घडामोडीशिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत

शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत

Subscribe

आम्ही शिवसेना सोडलेली नाही. परंतु या सगळ्यासाठी कोणीतरी उठाव करण्याची गरज होती, तो उठाव आम्ही केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. या मतदारांच्या आणि नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात, हीच त्यामागची भावना आहे, अशी खंत शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंवर आमची नाराजी नाही

सदा सरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की, ज्या आमदारांचे त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सुटत नव्हते. तसेच जे आमदार त्यादृष्टीने बघत होते, त्याचाच हा भाग असावा. लोकांचे प्रश्न सुटत नसल्याने पक्षाचा राजीनामा देण्यासाठी मी मानसिकता बनवली होती. परंतु अशा प्रकारचा जर उठाव होणार असेल तर त्यामध्ये मी सामील झालो. आम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही आम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यामध्ये सामील झालो. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही, असं सदा सरवणकर म्हणाले.

- Advertisement -

उठाव शिवसेना संपवण्यासाठी केला नाही तर…

शिवसेना संपावी अशी कोणाचीही भावना नाही. आम्ही हा उठाव शिवसेना संपवण्यासाठी केला नाही तर, जे त्या-त्या मतदारसंघात काम करून आलेले मतदार आहेत. तसेच ज्या आमदारांना आपले मतदार संघातले प्रश्न सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्या आमदारांना आपल्या खात्यातील मंत्र्यांकडून हवा असलेला प्रतिसाद मिळत नव्हता, असं सरवणकर म्हणाले.

उठावाची सुरूवात झाली आणि ५० आमदार एकत्र आले

ज्यावेळी या उठावाची सुरूवात झाली आणि ५० आमदार एकत्र आले. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की, प्रमुख जबाबदारी सोडून जर इतर कोणतीही जबाबदारी मिळणार असेल, तर त्यामध्ये आम्हाला रस नाही. परंतु आपण मुख्यमंत्री होऊन जर सर्वांचे प्रश्न सुटणार असतील तरच आम्ही या सगळ्यांत सहभागी होऊ ही आमची पहिली अट होती, सरवणकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील रेल्वे रुळांवर कोसळली भिंत, हार्बरची वाहतूक २ तास ठप्प; प्रवाशांचे हाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -