Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवारांचा सल्ला डावलून नातू पूरग्रस्त दौऱ्यावर, सदाभाऊ खोत यांचा निशाणा

शरद पवारांचा सल्ला डावलून नातू पूरग्रस्त दौऱ्यावर, सदाभाऊ खोत यांचा निशाणा

आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीस यांच्याकरता होता? - सदाभाऊ खोत

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा गरज नसल्यास राजकीय नेत्यांनी टाळावा असे आवाहन केले होते. शरद पवार यांचा सल्ला डावलून नातू आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्या दौऱ्यावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल आणि फडणवीस यांच्यासाठी होता का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच आजोबांचा सल्ला नातवच मानत नाही अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

पूरग्रस्त भागातील पंचनामे आणि मदत कार्य वेगाने व्हावेत यासाठी राजकीय नेत्यांनी तेथील दौरे टाळले पाहिजेत. नेत्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर एकीकडे शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे शरद पवारांचा सल्ला नातूच मानत नाही असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात अनेक राज्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले

- Advertisement -

आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांच्या दौऱ्यावर टीका करताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आजोबांनी सांगितले राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करु नयेत. आजोबांच्या सल्ल्याला नातवाचा मान नाही आणि जामखेडचे आमदार चिपळूण दौऱ्यावर की आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीस यांच्याकरता होता? असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

शरद पवार यांचे आवाहन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचं दौरा करण्याचे काम आहे. परंतू ज्या नेत्यांचा त्या भागाशी संबंध नाही अशा नेत्यांनी राजकीय दौरे टाळावे जेणेकरुन स्थानिक प्रशासानाला मदत कार्यामध्ये अडथळा येणार नाही. यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, राजकीय नेते पूरग्रस्त भागात गेल्यावर त्यांच्याकडे यंत्रणांना लक्ष द्यावे लागते यामुळे यंत्रणांच्या कामावर ताण येतो म्हणून नेत्यांनी दौरा टाळला पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी केलं होते.

- Advertisement -